अनुदान वाटपातील अडथळे दूर करण्यासाठी विशेष टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित; सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सेवा सुरू.
अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष व्यवस्था
अतिवृष्टी आणि पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या वाटपात अडथळे येत आहेत, तसेच अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याच पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि तक्रारींची नोंद घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एक विशेष टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.
तक्रार नोंदवण्यासाठी टोल-फ्री क्रमांक
यापूर्वी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी व अडचणी तात्काळ नोंदवून घेण्यासाठी विभागाने हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध केला आहे.





















