गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
Read More
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
Read More
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
Read More
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
Read More
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
Read More

महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढणार! १५ डिसेंबर ते १५ जानेवारी ‘अतिथंड’ कालावधी

उत्तर-ईशान्येकडील वाऱ्यांमुळे तापमानात मोठी घसरण; उत्तर महाराष्ट्रात पारा १०°C खाली जाण्याची शक्यता.

हवामानाची सध्याची स्थिती आणि थंडीची तीव्रता

महाराष्ट्राच्या उत्तर-पूर्व भागात आजपासून (ता. १४) हवेचे दाब १०१४ हेप्टापास्कल, तर मध्य आणि पश्चिम भागात १०१२ हेप्टापास्कल इतके राहण्याची शक्यता आहे. हवेच्या या दाबांमुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवेल. पश्चिम मध्य महाराष्ट्रात मात्र थंडीचा प्रभाव मध्यम स्वरूपात राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने उत्तर व ईशान्य दिशेने राहील. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे तापमानात सातत्याने घसरण सुरू राहील आणि रात्री तसेच पहाटे थंडीचा कडाका अधिक जाणवेल. सकाळी बंडाळीची तीव्रता अधिक राहील, तर दुपारच्या वेळी देखील थंड लहरी (Cold Waves) जाणवतील.

ADS किंमत पहा ×

‘अतिथंड’ कालावधी आणि तापमानाचा अंदाज

यापुढील काळात कमाल (दिवसाचे) आणि किमान (रात्रीचे) तापमान सातत्याने खाली येत राहील. साधारण १५ डिसेंबर ते १५ जानेवारी हा कालावधी महाराष्ट्रासाठी ‘अतिथंड’ राहील. या आठवड्यात महाराष्ट्राच्या उत्तरेकडे आणि पूर्व भागात तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवले जाण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग वाढेल, ज्यामुळे थंड लहरींची तीव्रता वाढेल. दुपारच्या वेळी हवामान थंड आणि कोरडे राहील.

Leave a Comment