गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
Read More
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
Read More
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
Read More
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
Read More
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
Read More

कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! बांगलादेशने आयात परवाने वाढवले, निर्यात चौपट होणार

आजपासून दररोज २०० आयात परवाने जारी करण्याची प्रक्रिया सुरू; देशांतर्गत बाजारात दर सुधारण्याची शक्यता, शेतकऱ्यांमध्ये आशा.

बांगलादेशकडून आयात परवाने वाढवले

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याच्या आयातीसाठी परवाने (Import Permits – IP) मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. यापूर्वी केवळ ५० आयातीचे परवाने देण्यात आले होते, परंतु आता ही संख्या वाढवून २०० परवाने इतकी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारतातून कांद्याची निर्यात चौपट वाढण्यास मोठी मदत होणार आहे, ज्यामुळे देशांतर्गत बाजारातही कांद्याचे दर बदलू लागतील.

ADS किंमत पहा ×

दररोज २०० परवाने जारी होणार

बांगलादेश सरकारने स्थानिक कांद्याची बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी, १३ डिसेंबर (आज) पासून दररोज २०० आयात परवाने जारी करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक परवान्याद्वारे पूर्वीप्रमाणेच ३० टनपर्यंत कांद्याची आयात करता येईल. प्रत्येक आयातदार एका वेळी एकच अर्ज सादर करू शकतो. कांद्याची बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी ही प्रक्रिया पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहील, असे कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या कारणामुळे भारतातही कांद्याला चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Leave a Comment