गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पहिले पाणी आणि खत व्यवस्थापन
Read More
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
जानेवारी २०२६ केवळ थंडी! पण फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळीचे तीव्र संकेत; महाराष्ट्रात थंडीत चढ-उतार
Read More
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
हिवाळी अधिवेशन २०२५ चा समारोप: शेतकऱ्यांसाठी ‘कर्जमाफी’ची मोठी घोषणा; पण अनुदानाचे प्रश्न मात्र गुलदस्त्यात
Read More
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
New Aadhaar App ; आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा प्रोसेस
Read More
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
थंडीची लाट नाहीशी होणार! १५ ते २१ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज
Read More

केवायसी पूर्ण असूनही अनुदान अडले! अतिवृष्टी नुकसान भरपाई कधी मिळणार?

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार? ६,५०० कोटींचे अनुदान जानेवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता; निवडणुकांची आचारसंहिता ठरणार निर्णायक.

नुकसान भरपाई वाटपाची सद्यस्थिती

सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा एकच महत्त्वाचा प्रश्न आहे की, ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करूनही अतिवृष्टी आणि रब्बी हंगामाचे अनुदान (नुकसान भरपाई) खात्यावर कधी जमा होणार? सरकारने आत्तापर्यंत १३,४७७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत, परंतु अजूनही सुमारे ६,००० ते ६,५०० कोटी रुपयांचे अनुदान देणे बाकी आहे. या उर्वरित अनुदानासाठी शेतकरी उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

ADS किंमत पहा ×

अनुदान जमा होण्यास आचारसंहितेचा अडथळा

शासन दरबारी मिळालेल्या माहितीनुसार, नुकसान भरपाईचा हा उर्वरित निधी जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, निधी वितरणाला होणाऱ्या या विलंबाचे मुख्य कारण निवडणुकीची आचारसंहिता आहे. भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात नेमकी कधी जमा होईल, हे पुढील आचारसंहिता कधी लागू होते यावर अवलंबून आहे. जर २१ डिसेंबरनंतर नवीन आचारसंहिता लागली, तर पैसे लगेच येण्याची शक्यता आहे. परंतु, जर जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या, तर निधी मिळण्यास १५ जानेवारीनंतरचा कालावधी लागू शकतो.

Leave a Comment