डिसेंबर-जानेवारीचा अंदाज ; पहा तोडकर यांचा पुढील दोन-तीन महीन्याचा अंदाज ; सध्याच्या नोंदीनुसार अरबी समुद्रात ला-निना (La Niña) ॲक्टिव्ह असून बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ एकापाठोपाठ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहेत, ज्यामुळे श्रीलंका आणि आंध्र प्रदेशात वातावरण खराब आहे. महाराष्ट्रात १६ डिसेंबरच्या आसपास बंगालच्या उपसागरात मोठे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असली तरी, थंडीची आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स (WD) ची ताकद एवढी जास्त आहे की हे लो प्रेशर महाराष्ट्राकडे सक्रिय होणार नाही.
१७, १८ आणि १९ डिसेंबर या तारखांच्या दरम्यान कोकण किनारपट्टी आणि नाशिक क्षेत्रात वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे धुई-धुराळी येण्याची शक्यता आहे, मात्र पाऊस अपेक्षित नाही. जानेवारी महिना साधारणपणे डिसेंबर महिन्यासारखाच जाईल, पण महिन्याच्या अखेरीस वातावरणात थोडाफार बदल होऊ शकतो; तरीही पावसाची कोणतीही स्पष्ट शक्यता नाही.
प्रशांत महासागरातील बदलांचा परिणाम (फेब्रुवारी आणि मार्च)
जानेवारीनंतर प्रशांत महासागरातील ला-निना ॲक्टिव्हिटीचा कल एल-निनो (El Niño) कडे होण्याची शक्यता आहे. या वातावरण बदलामुळे मान्सूनच्या टफ रेषा कमकुवत होतील आणि वेस्टर्न डिस्टर्बन्सला प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे उन्हाळ्यात अवकाळी पाऊस पडतो. मॉडेलनुसार, फेब्रुवारी महिन्यात राजस्थान आणि गुजरातच्या लगतच्या भागांपर्यंत दोन टप्प्यात हा अवकाळी पाऊस दिसू शकतो.
महाराष्ट्रात फेब्रुवारीमध्ये पावसाची संभाव्य शक्यता सध्याच्या अभ्यासात कमी दिसत आहे, परंतु जळगाव-खानदेश आणि विदर्भाच्या काही विशिष्ट भागांत (जसे की खामगाव परिसर) थोडेफार वातावरण सक्रिय होऊ शकते. फेब्रुवारीपेक्षा मार्च महिना अधिक लक्षणीय ठरू शकतो, मात्र थंडीची सुरुवात उशिरा झाल्यामुळे तिचा शेवटही उशिरा होईल आणि थंडीमुळे वातावरण बळकट राहून गारपीटीची किंवा मोठ्या नुकसानीची शक्यता कमी राहील, असे संकेत मॉडेल देत आहेत.
उन्हाळ्यातील एकूण स्थिती आणि पिकांची काळजी
मार्च, एप्रिल आणि मे हे तिन्ही महिने वातावरणाच्या दृष्टिकोनातून थोडे खराब राहू शकतात, परंतु एकापाठोपाठ एक सलग लगट राहणे किंवा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता यात दिसत नाहीये. हळद उत्पादक क्षेत्रांना हळद वाळवणीच्या वेळी (एप्रिलची अखेर आणि मे महिन्याची सुरुवात) काही भागांत त्रास होऊ शकतो.
हरभरा काढण्याच्या वेळी (फेब्रुवारीची अखेर किंवा मार्चची सुरुवात) आणि गहू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये थोडी धास्ती असेल. मात्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा वेळेत काढल्यास तो सुरक्षित निघू शकतो. एकंदरीत, अवकाळी पावसाची टक्केवारी घटत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. चांगला बदल झाल्यास प्रयोगशाळे अंतर्गत माहिती दिली जाईल.