कामगारांना १० वस्तूंच्या संचाचे वितरण
महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत (BOCW) कामगारांसाठी ‘अत्यावश्यक वस्तूंचा संच’ (Essential Kit) देण्याची नवीन योजना सुरू झाली आहे. या योजनेत पात्र कामगारांना त्यांच्या दैनंदिन वापरासाठी आवश्यक अशा एकूण १० वस्तूंचा संच दिला जातो. या संचामध्ये पत्र्याची पेटी (Tin Trunk), प्लास्टिकची स्टई/टब (Plastic Container), धान्य साठवणची दोन कोठी (एक २२ किलो क्षमतेची), बेडशीट आणि चादर, ब्लँकेट, साखर आणि चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बे आणि १८ लिटर क्षमतेचा वॉटर प्युरिफायर यांसारख्या महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश आहे. हा संच कामगारांना त्यांच्या निवासस्थानात उपयुक्त ठरणारा आहे.
ऑनलाईन अपॉइंटमेंट प्रक्रिया अनिवार्य
या अत्यावश्यक वस्तूंचा संच मिळवण्यासाठी कामगारांना ‘अत्यावश्यक संच वितरण’ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी कामगारांना त्यांचा ‘बीओ सीडब्ल्यू कामगार नोंदणी क्रमांक’ (BOCW Registration Number) आवश्यक आहे. हा नोंदणी क्रमांक महा बीओ सीडब्ल्यू पोर्टलवर आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर वापरून लॉग-इन केल्यानंतर प्रोफाइलमध्ये उपलब्ध होतो. नोंदणी क्रमांक प्राप्त झाल्यावर तो एसेंशियल किटच्या संकेतस्थळावर टाकून मोबाईलवर आलेल्या ओटीपीद्वारे (OTP) माहिती सत्यापित करावी लागते.




















