पूर आणि अवकाळी पावसामुळे राज्याची केंद्राकडे ₹२९,००० कोटींची मागणी; शेतकऱ्यांना मिळणार दुहेरी लाभ.
केंद्रीय पथक पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर
पूर आणि अवकाळी पावसामुळे राज्यात झालेल्या शेतीच्या आणि इतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे. हे पथक १४ आणि १५ डिसेंबर रोजी राज्यात नुकसानीची पाहणी करेल. पथकाच्या पाहणी अहवालानंतर मदतीवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
केंद्राकडे २९ हजार कोटींची मागणी
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ७० हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना ही माहिती दिली. महाराष्ट्र सरकारने पूर आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी केंद्राकडे सुमारे ₹२९,००० कोटी रुपयांची मदत मागितली आहे.




















